कोल्हापूरकर ऑस्कर विजेत्या भानू अथय्या यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली…!

| मुंबई | आपल्या कर्तृत्वाने भारतीय कला क्षेत्राचा झेंडा जगाच्या पटलावर रोवणाऱ्या कलाकार म्हणून वेशभूषाकार भानू अथय्या सदैव स्मरणात राहतील. जमिनीवर पाय असलेली पण तितक्याच उत्तूंग सर्जनशीलतेची महान कलाकार आपल्यातून निघून गेली आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट सृष्टीतील जागतिकस्त रावरील मानांकित ऑस्कर पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय कलाकार ज्येष्ठ वेशभूषाकार भानू अथय्या यांना अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, भारतीय कला क्षेत्राला विशेषतः चित्रपट सृष्टीला खुणावणारे ऑस्कर भानू अथय्या यांनी आपल्या वेशभूषाकाराच्या निपुणतेने खेचून आणले. मुळच्या कोल्हापूरच्या मराठी कुटुंबातून आलेल्या भानूजींनी चित्रपट सृष्टीत आपला असा दबदबा निर्माण केला. हिंदी चित्रपट सृष्टीतील शंभरहून अधिक चित्रपटात त्यांनी आपल्या वेशभूषाकाराच्या कामाची छाप उमटवली. आजही या चित्रपटातील त्यांची कामगिरी टवटवीत आणि नजरेत भरणारी अशी वाटते. गांधी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा ऑस्कर पुरस्कार मिळूनही त्या अलिकडच्या चित्रपटांसाठी नव्या पिढीतील कलाकारांसोबत काम करत राहील्या. त्यांचा भारतीय संस्कृती आणि परंपरांचा कलाविष्कारांच्या अंगाने गाढा अभ्यास होता. उत्तूंग सर्जनशीलता असूनही जमिनीवर पाय असलेल्या त्या महान कलाकार होत्या. आपल्या कर्तृत्वाने भारतीय कला क्षेत्राचा झेंडा जगाच्या पटलावर रोवणाऱ्या कलाकार म्हणून त्या सदैव स्मरणात राहतील.महान कलाकार भानू अथय्या यांना विनम्र श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *