| मुंबई | ऑगस्ट महिना सुरू झाला आणि चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावाकडे जाण्याचे वेध लागले. पण राज्यभरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढत जाणारी संख्या बघता. कोरोना परिस्थितीमुळे गावाकडे येण्यास निर्बंध लादण्यात आले आहेत. पण आता रत्नागिरीत येणाऱ्या चाकरमान्यांना विना पास परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई, पुण्याप्रमाणेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे यंदा कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना काही अटी घालण्यात आल्या आहेत. या आधी कोकणात येणाऱ्याना चौदा दिवसांचा क्वारंटाइन पाळणे बंधनकारक होते. मात्र आता या सर्व अटी शिथील करण्यात आल्या आहेत.
प्रवेशासाठी पासाची गरज नाही :
ज्या चाकरमान्यांकडे पास नाही अशा चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कशेडी घाटात असलेले कडक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय घेतला आहे. याआधी विनापरवानगी घेऊन जिल्ह्यात येण्यास बंदी होती. पण, आता हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. सध्या चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणाच्या वाटेवर आहेत. त्यामुळे रत्नागिरीमध्ये येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .