जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेला बोलवणार; मुख्यमंत्र्यांचे बार्शी पेन्शन हक्क संघटनेला आश्वासन..!

| उस्मानाबाद | अतिवृष्टीमुळे झालेल्या अपरिमित हानीमध्ये शेतकरी बांधवांना मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी कात्री तुळजापूर येथे आज दिनांक २१ ऑक्टोबर रोजी भेट दिली यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री संदीपान भुमरे, पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी जुनी पेन्शन हक्क संघटना सोलापूरच्या वतीने DCPS धारकांचे शासनाकडे जमा असलेली रक्कम शेतकऱ्यांसाठी वापरून त्याबदल्यात कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी आग्रही मागणी, यावेळी संघटनेकडून निवेदन देवून मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली. या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन मिलिंद नार्वेकरांना जुनी पेन्शन संघटना सोलापूरच्या निवेदनाची दखल घेण्यास सांगितले.

https://twitter.com/thelokshakti/status/1318889991028854784?s=19

सचिव मिलिंद नार्वेकरांनी मोहन पवार यांच्याकडून संघटनेची आतापर्यंतची निवेदने पेपरमधील बातम्या कात्रणे याचे सविस्तर वाचन करून लवकरच जुनी पेन्शन संघटनेच्या शिष्टमंडळाला मुंबई येथे चर्चेसाठी बोलावतो असे आश्वासन दिले. यावेळी जुन्या पेन्शनचे बार्शीचे सरचिटणीस प्रवीण देशमुख, जिल्हा नेते संदीप गायकवाड, बंडू गोरे, विश्वनाथ ढाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या दरम्यान चित्रकार महेश मस्के यांनी तयार केलेले स्केच देऊन जुनी पेन्शन संघटना बार्शीतर्फे मुख्यमंत्री महोदयाचा सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *