जुन्या पेन्शनसाठी प्राध्यापकांचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना ट्विटर व ई-मेलद्वारे साकडे..!
महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेन्शन हक्क कृती समितीचे आंदोलन यशस्वी ..

| पुणे | आयुष्याच्या सरतेशेवटी सन्मानाने जगता यावे यासाठी कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी पेन्शन मिळावी यासाठी २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांनी दिनांक ८ आणि ९ ऑगस्ट २०२० या दोन दिवशी ऑनलाईन आंदोलन केले. या आंदोलनामध्ये दिनांक ८ रोजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना वैयक्तिक ई-मेल पाठवून आमची जुन्या पेन्शनची मागणी पूर्ण करावी व कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी पेन्शन सुरू करावी अशी मागणी ई मेलच्या माध्यमातून करण्यात आली. दिनांक ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनाचे औचित्य साधून ट्विटर वार करण्यात आले. यामध्ये #NPSनिजिकरणभारतछोडो हा हॅशटॅग वापरून भारतभर पंतप्रधान, मुख्यमंत्री त्याचबरोबर सर्व मंत्री आणि वेगवेगळ्या माध्यमांना ट्वीट करण्यात आले. यापूर्वीही रिस्टोर ओल्ड पेंशन ( Restore old pension) हा टॅग वापरून ट्विटर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला जगतिक कीर्तीचे अर्थतज्ञ रघुराम राजन (आर बी आय चे माजी गव्हर्नर) व अनेक अर्थतज्ञांनी पाठिंबा जाहीर केला होता.

आजच्या या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ ३ लाख ८५ हजार कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला. ५ वर्षासाठी निवडून येणाऱ्या आमदार व खासदारांना ८० हजार रुपये पेन्शन देण्याची योजना आहे. पण जी व्यक्ती आपल्या आयुष्यातील २५ ते ३० वर्ष नोकरी करते, त्यांना मात्र पेन्शन देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे. आज एस टी कर्मचारी, महावितरण कर्मचारी याना तर १५०० ते २००० रुपये इतकीच पेन्शन मिळते. नव्या dcps व nps ही पेन्शन योजना शेअर मार्केट वर आधारलेली असून त्यामध्ये निश्चित अशी पेन्शन देण्याची कोणतीच तरतूद नाही त्यामुळे सर्व देशभर या पेन्शनविरोधात सर्व विभागातील कर्मचारी एकत्र येत आहेत, याचाच एक भाग म्हणून हे आंदोलन करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे ऑनलाईन आंदोलन करण्यात आले. सरकारने जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापुढेही तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनास देशभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामध्ये प्राध्यापकांच्या वतीने महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेन्शन हक्क कृती समिती सहभागी झाली होती. या समितीच्या माध्यमातून हजारो प्राध्यापकांनी ई-मेल पाठवले त्याचबरोबर ट्विट केले, अशी माहिती संघटनेचे राज्य समन्वयक प्रा. डॉ सोमनाथ वाघमारे यांनी दिली. कोरोनाच्या काळामध्ये आपली मागणी न्याय्य मार्गाने सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्याकडे केली. या दोनही आंदोलनाला भारतभर व महाराष्ट्रभर उस्फुर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून ४ हजार प्राध्यापकांनी या आंदोलनात सहभागी नोंदवला .

महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेन्शन हक्क कृती समिती यांच्यावतीने दिवसभर मोठ्या प्रमाणात ई-मेल पाठवण्यात आले व ट्विट करण्यात आले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी राज्य संघटनेचे पदाधिकारी डॉ भरत जाधव (सातारा) डॉ सोमनाथ वाघमारे (पुणे) डॉ मारुती तेगमपुरे (जालना) , डॉ उमाकांत राठोड (औरंगाबाद) , प्रा डॉ अमोल लाटे (लातूर), प्रा डॉ मुंजाब कव्हळे, (माजलगाव), प्रा डॉ रमेश बहाद्दूरे, (अमरावती), प्रा डॉ सोपान साळुंखे (जळगाव), प्रा डॉ संतोष बाबर (कोल्हापूर), प्रा डॉ नितीन पडवळ, (उस्मानाबाद), डॉ अतुल चौरपगार (अहमदनगर), प्रा डॉ महेश आहेर (अहमदनगर), प्रा डॉ अमोल काटेगावकर (नाशिक), प्रा डॉ महेश आसबे (सोलापूर), प्रा डॉ शिवाजी कुळाल (सांगली), प्रा डॉ उदय भोसले (मुंबई), प्रा डॉ कैलास कागदे (मुंबई) व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *