| मुंबई | अनलॉक 5.0 च्या घोषणेनंतर देशात अनेक सेवा- सुविधा पुन्हा सुरु झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता आणखी एक भर पडली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटाची पार्श्वभूमी पाहता जवळपास सात महिन्यांपासून कुलूपबंद असणारी चित्रपटगृह आता पुन्हा एकदा सुरु होत आहेत. महाराष्ट्राच मात्र ही बंदी कायम असणार आहे.
केंद्राकडून अनल़़ॉकच्या या टप्प्यात चित्रपटगृह खुली करण्यासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ज्यांचं सक्तीनं पालन करणं अपेक्षित आहे. शिवाय नवे चित्रपट दाखवण्यात येणार की, दरम्यानच्या काळातील चित्रपट पुन्हा प्रदर्शित केले जाणार याबाबतचा निर्णय मात्र प्रतिक्षेत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला चित्रपटगृहांमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेले चित्रपटही दाखवण्यात येणार आहेत.
चित्रपटगृह पुन्हा सुरु करण्याचा निर्णय देत केंद्रानं दिलेले काही नियम :
✓ चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु करण्यात येणार आहेत.
✓ चित्रपटगृहांमध्ये एक आसन सोडूनच पुढच्या आसनावर बसण्याची व्यवस्था केलेली असवी.
✓ चित्रपटगृहात मास्कचा वापर सक्तीचा असेल.
✓ चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकानं सोबत सॅनिटायझर बाळगणं आणि त्याचा वापर करणं गरजेचं आणि अपेक्षित असेल.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .