| वॉशिंग्टन | कोरोना व्हायरसपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचीनवर खूप नाराज आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा माध्यमांद्वारे चीनवर निशाणा साधला असून कोरोना व्हायरस पसरवल्याबद्दल थेट आरोप केला आहे. तसेच, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी अॅप ‘टिकटॉक’वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. एका एक्झिक्युटीव्ह आदेशासह अमेरिकेत २४ तासांवर टिकटॉकवर बंदी घातली जाईल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेतही टिकटॉकवर बंदी घातली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले होते. आमचे प्रशासनदेखील टिकटॉकवर कारवाई करण्यासाठी त्याचे मूल्यांकन करीत आहे. एक लोकप्रिय चीनी व्हिडिओ अॅप आता राष्ट्रीय सुरक्षा आणि सेन्सॉरशिपच्या मुद्याचे स्रोत बनले आहे, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते.
बाईटडान्स कंपनी टिकटॉकला विकण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात कंपनीकडून मायक्रोसॉफ्टसोबत चर्चा सुरु आहे. अशातच डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. आम्ही टिकटॉक पाहात आहोत. आम्ही यावरही बंदी घालू शकतो. आम्ही आणखी काहीही करू शकतो. आमच्याकडे इतरही अनेक पर्याय आहेत. ब-याच गोष्टी घडत आहेत. त्यामुळे आम्ही पाहणार की, काय होऊ शकत, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अनेक विदेशी मीडिया वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, बाईटडान्स लवकरच स्वत:ला टिकटॉकपासून वेगळे असल्याचे जाहीर करेल. अमेरिकेच्या अनेक बड्या टेक कंपन्यांकडून आणि फायन्सशियल फर्मकडून टिकटॉक खरेदी केल्याचे वृत्त समोर आले आहे. न्यूयॉर्क टाइम्स आणि फॉक्स न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, मायक्रोसॉफ्ट टिकटॉक विकत घेऊ शकेल आणि कंपनी याबाबत चर्चा करत आहे.
टिकटॉकने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, आम्हाला तर्कवितर्क आणि अफवांवर भाष्य करण्याची इच्छा नाही, टिकटॉकच्या प्रदीर्घ यशावर आमचा विश्वास आहे. बाईटडान्सने २०१७ मध्ये टिकटॉक लाँच केले होते. अगदी अल्पावधीतच टिकटॉक तरुणांमध्ये लोकप्रिय झाले. दरम्यान, भारतात टिकटॉकवर यापूर्वीच बंदी घातली आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .