| कोल्हापूर : प्रतिनिधी | कोल्हापूर येथील डायमंड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या पहिले हिंद केसरी पै. श्रीपती खंचनाळे यांच्यावरील उपचारासाठी ठाणे येथील डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनतर्फ़े आज 1 लक्ष रुपयांची लाख मोलाची मदत सुपूर्द करण्यात आली. राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिवसेना मा.आ.डॉ.सुजित मिनचेकर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते ही मदत श्री खंचनाळे यांचे चिरंजीव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी उपरोक्त सर्वांनी अतिदक्षता विभागात पैलवान श्रीपती खंचनाळे यांची भेट घेवून तब्येतीची विचारपूस केली. आरोग्य राज्य मंत्री श्री यड्रावकर यांनी यावेळी श्री. खंचनाळे यांच्या उपचारासाठी शासनामार्फतही आवश्यक ती सर्व मदत केली जाईल अशी ग्वाही दिली.
कोल्हापूरमध्ये डायमंड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या महाराष्ट्रातील पहिले हिंदकेसरी श्री. खंचनाळे यांच्याबाबतची बातमी समजताच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी डाॕ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून मदत करण्याचा सूचना दिल्या होत्या. तसेच उपचारामध्ये विशेष लक्ष देण्यात यावे यासाठी डायमंड हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ साई प्रसाद यांच्यासमवेत दूरध्वनीवरून संवाद साधला होता.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनीही आज आवर्जून श्रीपती खंचनाळे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाशी तसेच आरोग्य राज्य मंत्री मा ना श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचेशी संवाद साधला. यावेळी डॉ श्रीकांत शिंदे यांनी श्री खंचनाळे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ साईप्रसाद व डॉ कौस्तुभ यांचे विशेष आभार मानले. यापुढील काळातही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कुस्तीपटूना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत लागली तर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला संपर्क करावा, आपण कुस्तीपटूसाठी सर्वोतोपरी मदत करण्यास तयार आहोत अशी ग्वाही यावेळी डॉ शिंदे यांनी दिली.
तर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून तसेच डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब गरजू रुग्णांना सर्वोतोपरी मदत करण्यात येते , यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या शिवसेना भवन येथील मुख्यालयात संपर्क साधावा असे आवाहन कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी केले.
यावेळी माजी आमदार सुजीत मिणचेकर, डायमंड हॉस्पिटलचे डॉ. साई प्रसाद, डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .