
| मुंबई | मुदत संपलेल्या किंवा लवकरच संपणा-या कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, औरंगाबाद आणि कोल्हापूर या पाच महानगरपालिका, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूरसह १५ ते २० नगरपालिका, काही नगरपंचायती आणि राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या फेब्रुवारीत घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.
कोरोनाची साथ असतानाही बिहार विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. परंतु कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली तरच फेब्रुवारीत निवडणुका घेण्याचे नियोजन आहे. कोरोनामळे एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपलेल्या आणि नवनिर्मित अशा १,५६६; तसेच जुलै ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणा-या आणि नवनिर्मित १२ हजार ६६७ अशा एकूण १४ हजार २३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या अद्ययावत केल्या जात आहेत. यापैकी एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपलेल्या १,५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ३१ मार्च रोजी मतदान होणार होते; परंतु कोरोनामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.
मतदार याद्यांत नाव नोंदविलेल्या सर्वांना मतदान करता यावे किंवा निवडणूक लढविता यावी, हे लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे. त्यामुळे विधानसभा मतदारसंघाच्या २५ सप्टेंबर रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणा-या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जातील. हरकती व सूचनांसंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री