
| मुंबई | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची कोविडची चाचणी करण्यात आली असून रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मनसेचे नेते अमित ठाकरे यांना गेल्या दोन दिवसांपासून ताप आला होता, तसंच प्रकृतीही ठीक नव्हती. त्यामुळे अखेर खबरदारी म्हणून लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर अमित ठाकरे यांची कोविड-19 ची चाचणी करण्यात आली. पण, सुदैवाने कोविडची चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. मलेरिया आणि इतरही चाचण्या करण्यात आल्या आहे. पण, त्यांचेही रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहे. व्हायरल फिव्हर असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. पण, कोरोनाच्या काळात खबरदारी म्हणून पुढील दोन ते तीन दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
कोरोनाच्या परिस्थितीत काळजी घेणे गरजेचं आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस त्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. योग्य त्या उपचारानंतर अमित ठाकरे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल, असंही डॉक्टरांनी सांगितले आहे.
अमित ठाकरे यांच्यावर पक्षात मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानंतर राजकारणात ते सक्रीय झाले आहेत. दरम्यान कोरोनाच्या काळात देखील अमित ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर मदत कार्य केले आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री