| मुंबई | मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न पाहू नये. त्यांचं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे आता महापालिका निवडणुकीतही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार हे आता स्पष्ट झालं आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
भाजपाच्या मुंबई कार्यकारिणीची महत्वाची बैठक मुंबईत पार पडली. त्यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी मिशन मुंबई सुरु केल्याची घोषणा केली तसंच कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला खात्री आहे या कार्यकारिणीच्या काळात मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांचं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. मुंबई महापालिका आपल्या ताब्यात यावी असं फडणवीसांना वाटणं साहजिकच आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जोपर्यंत शिवसेनेसोबत आहे तोपर्यंत भाजपाचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. टीव्ही नाइन मराठीशी जयंत पाटील यांनी जो संवाद साधला त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .