
कोणत्याही ऋतूमध्ये सुकामेवा खाणे फायद्याचेच ठरते. मात्र, हिवाळ्यात सुकामेवा शरीरातील ऊब टिकवण्यासाठी फायद्याचा ठरतो. त्यातही खास करुन मनुका हिवाळ्यात खाणे अधिक फायद्याचे असते. आयुर्वेदानुसार मनुकांमध्ये भरपूर मात्रेत औषधीय गुण असतात. आम्हाला रोज ४-५ मनुका खायलाच पाहिजे. मनुकांना सर्दी-खोकला आणि कफ दूर करण्याचे सर्वात उत्तम औषध मानले जाते. त्याशिवाय देखील मनुकांचे बरेच फायदे असतात. त्यात उपस्थित न्यूट्रिएंट्स बर्याच आजारांमध्ये फायदेशीर ठरतात. तर जाणून घेऊ रोज मनुका खाण्याचे काय फायदे आहेत.
मनुक्यामधील लोह, पोटॅशियम आणि तंतू (फायबर) रक्तदाब कमी करुन पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतात. मनुका हा मधुर, शीतल, हृदयासाठी हितकारक, श्रमनाशक, रक्तवर्धक असतो. याशिवाय मनुक्याचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे होतात. जाणून घेऊयात मनुक्याचे सेवन कशापद्धतीने केल्यावर कोणते फायदे होतात…
✓ मनुक्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तासंदर्भातील आजारांवर मनुका गुणकारी ठरतो. रात्री पाण्यात भिजत ठेवलेला मनुका सकाळी खालल्यास रक्ताच्या कमतरता संदर्भातील अॅनिमिया आजार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.
✓ मनुक्यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. रोज एक चमचा मनुके लसणाच्या पाकळीसोबत खाल्ल्यास रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.
✓ मनुक्यामधील अँटिऑक्सिडेंट शरीरातील पेशीसांठी घातक असणाऱ्या फ्री रॅडिकल्सचे प्रमाण कमी करतात. यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो
✓ झोपण्याच्या एक तास आधी उकळेल्या दुधामधून मनुक्यांचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित आजारांवर मात मिळवता येते. खास करुन बद्धकोष्टावर हा उपाय करुन पाहिल्यास नक्कीच फायदा होतो. यामुळे पचनक्रियाही सुधारते.
✓ मनुक्यामधील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्याची क्षमता असते. त्यामुळेच ताप आल्यावर मनुके खावेत. ताप लवकर उतरण्यासाठी मनुक्याचे सेवन करणे फायद्याचे ठरते.
✓ मनुक्यामध्ये बोरॉन नावाचा रासायनिक घटक असतो जो सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्ती देण्यासाठी उपयुक्त ठरतो.
✓ डोळ्यांच्या आरोग्यासाठी बीटा कॅरोटीन फायद्याचे ठरते. मनुक्यामध्ये बीटा कॅरोटीन बऱ्याच मोठ्या प्रमाणत असते. त्यामुळे नजर सुधारण्यासाठी डोळ्यांच्या आरोग्यासाठी मनुक्याचे सेवन करावे.
✓ दिवसातून दोन वेळा मनुक्यांचे व्यवस्थित चावून सेवन केल्यास ते गळ्यासाठी फायद्याचे असते.
✓ मनुका शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण मर्यादीत ठेवण्यास मदत करतो ज्यामुळे हृद्यविकाराची धोका कमी होतो.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री