| पुणे / विनायक शिंदे | महाराष्ट्र विधान परिषदेच्या ३ पदवीधर व २ शिक्षक मतदार संघ अशा ५ जागांसाठी १ डिसेंबर रोजी निवडणूक होणार असे जाहीर झाले, पुणे पदवीधर मतदार संघाचे सदस्य असलेले चंद्रकात पाटील विधानसभेवर निवडून गेल्याने गेल्या वर्षी पासून पुणे पदवीधर मतदारसंघ जागा रिक्त होती. तर १९ जुलै २०२० रोजी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग मतदारसंघातून अनुक्रमे सतिश चव्हाण, अनिल सोले, श्रीकांत देशपांडे व दत्तात्रय सावंत निवृत्त झाले आहेत. कोरोना महामारीच्या संकटातून महाराष्ट्र सावरू लागला असताना या निवडणूकीने ऐन दिवाळीत राजकीय आरोप प्रत्यारोपाचे फटाके उडताना पाहयला मिळणार आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघ :
पाश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्हयांमध्ये विस्तारलेला हा मतदारसंघ. ९ पुर्ण व २ अंशतः अशा ११ लोकसभा मतदारसंघाचे व ५७ मतदार संघाचे प्रभाव क्षेत्र आहे. ५ महानगरपालिका व अनेक नगरपरिषदा अशा शहरी व ग्रामीण भाग अशा संमिश्र स्वरूपाचा मतदारसंघ.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ व शिवाजी कोल्हापूर विद्यापीठ अशी नामांकीत विद्यापीठ या मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात आहेत. ३० ते ४० लाख पेक्षा जास्त विविध क्षेत्रातील पदवीधर रहिवाशी असताना देखील फक्त ३ ते ४ लाख पदवीधर मतदारांची नोंदणी पदवीधर मतदारसंघ मतदार यादीत झालेली दिसून येते.
पदवीधरांचे प्रश्न विधिमंडळात मांडले जावे या हेतूने निर्माण झालेले मतदारसंघ विविध पक्षांच्या विधान परिषदेतील पक्षीय बलाबल टिकवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी राजकीय आखाडा बनले.
महाविकास आघाडी विरुद्ध भाजप :
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर १ वर्षपूर्ती वेळेस महाविकास आघाडी किती मजबूत आहे, तिन्ही पक्षांचा समन्वय किती आहे, स्थानिक पातळीवर कार्यकर्तांना ही आघाडी कितपत रुचली या सर्वांची अग्नी परीक्षाच ही निवडणूक असेल. महाआघाडीचा धर्म कोणकोणते पक्ष पाळतात हेही पाहयला मिळणार आहे. या उलट भाजप एकटाच असल्याने संभाव्य बंडखोऱ्या टाळल्यास भाजपच्या प्रचारयंत्रणेत एकसूत्रीपणा जाणवेल. दोन्हीकडे अनेक इच्छुक आहेत, दोन्हीकडे बंडखोरी होणार व सर्व पक्षनेतृत्वाची ती आवरण्यात दमछाक होणार हे मात्र नक्की आहे.
पुणे विभागातील ५७ आमदारांपैकी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे मिळून ३७ आमदार ( राष्ट्रवादी काँग्रेस २२, काँग्रेस १० , शिवसेना ५ ) तर भाजपचे २१ आमदार आहेत.
९ खासदारपैकी महाविकास आघाडी ५ ( राष्ट्रवादी काँग्रेस ३ , शिवसेना २ ) भाजप ४ असे बलाबल आहे.
५ महानगरपालिकांपैकी ४ महानगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता आहे तर १ महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आहे.
महाविकास आघाडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार हे घोषित झाले नसले तरी निश्चित आहे. महाविकास आघाडीची ताकद कागदावर जास्त दिसत असली तरी भाजपचा एकसंघपणा यामुळे लढत ही काँटे की टक्कर होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे २०१४ चे उमेदवार सारंग पाटील हे निवडणूक लढवणार नाहीत तर २०१४ साली बंडखोरी केलेले अरुण लाड पुन्हा शर्यतीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील देखील कामाला लागले आहेत. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील शर्यतीत आहेत.
निवडणूक लढवणारच असे निश्चित केलेल राष्ट्रवादी काँग्रेस कडून वा अपक्ष असे शिवचरित्रकार ,व्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे गेली २ वर्ष तयारीत आहेत. गेली २ वर्ष सर्व मतदारसंघ पिंजून काढला आहे. सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीचे संबंध आहेत, लाखो पदवीधर मतदारांची नोंदणी करवून घेतली, विविध प्रश्नांवरती वेळोवेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केल्या आहेत.
भाजपाकडून कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी इच्छुकांच्या यादीत आघाडीवर आहेत , माजी मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख, गिरिष बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडीक, शेखर चरेगावकर या सर्वांची नावे चर्चेत आहेत परंतू भाजप अनपेक्षित नाव निश्चित करुन धक्कातंत्राचा अवलंब करतोय हे पाहणे औत्सुकतेचे ठरतेय.
पुणे पदवीधर मतदारसंघाची लढत दुरंगी होणार की तिरंगी हे नक्की नाही परंतु रंगबेरंगी होणार मात्र नक्की आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .
Ritired secondary Teacher Moved shrenee
Ritired secondary Teacher Moved shrenee Lagoo sathi Upay yojna