| जालना | घनसावंगी नगर पंचायत येथे समाजभान व एक्का फौंडेशन संचलित मराठीमाती प्रतिष्ठान ठाणे यांच्या वतीने कोरोनाकाळात माणूस, समाज आणि देश यांच्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खऱ्या कोरोना योध्याचा “मानवतेचे साथी सन्मान” व “अभिमानपत्र” देऊन सन्मान करण्यात आला.
संपूर्ण भारत एकजूट होऊन कोरोना या महामारी या भीषण संकटाशी लढत आहे, अशा खडतर परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता संघर्ष करणारे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी व सामजिक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. हा उपक्रम नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक्का फौंडेशन मार्फत संपूर्ण राज्यभरात अभिमानपत्र देऊन करण्यात येत आहे. समाजभानच्या माध्यमातून मराठवड्यामधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचा अभिमान पत्र व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
काल या सन्मानाचे मानकरी ठरलेले घनसावंगीचे तहसीलदार नरेंद्र देशमुख, जालना जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती कल्याण सपाटे, पोलीस निरिक्षक शिवाजी बंटेवाड , नगर पंचायत मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, पंचायत समितीचे सभापती भागवत रक्ताटे, उपसभापती बन्सीधर शेळके, नगराध्यक्ष राज देशमुख, डॉ जूजकर, डॉ लहू मिसाळ, विक्रम देशमुख, अर्जुन यादव, डॉ. गंगाधर धांडगे, अविनाश घोगरे आदींना हा सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपानगराध्यक्ष नवाबभाई सय्यद, नगरसेवक सतीश चव्हाण, कैलास पवार, विलास गायकवाड, गणेश हिवाळे, संभाजी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक आणि समाजभानचे अध्यक्ष दादासाहेब थेटे यांनी केले, तर सूत्रसंचालन समाजभानचे अरविंद घोगरे यांनी केले. यावेळी आभार प्रदर्शन गणेश मिरकड यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजभानचे इरफान खान, अरविंदजी घोगरे, शरद आधुडे,नानासाहेब देवडे, अविनाश घोगरे, अभिजित आधुडे, डॉ गंगाधर धांडगे, अनवर सय्यद, नगर पंचायतचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान या उपक्रमाला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र प्रमुख मंगेश चिवटे यांचे सहकार्य लाभले असून दैनिक लोकशक्ती, इडियट ट्रेकर्स ग्रुप हे त्याचे सह आयोजक आहेत.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .