अकोले आणि डाळज गावाची होणार संपूर्ण तपासणी- जि. प सदस्य हनुमंत बंडगर

| इंदापूर / महादेव बंडगर | पुण्यामध्ये आता शहरांपाठोपाठ ग्रामीण भागात ही कोरोणाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे.हा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने व कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनानेही कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती यांच्यामार्फत सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तामामा भरणे, खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण शेटफळगढे जिल्हा परिषद गटांमधील कोरोनाने विळखा घातलेल्या अकोले या गावामध्ये दि.१६ सप्टेंबर रोजी एकूण १६ पथकांद्वारे तर डाळज नं-१ या गावामध्ये एकूण ६ पथकांद्वारे गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य हनुमंत बंडगर यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार सर्व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना हे काम देण्यात आले आहे. आरोग्य कर्मचारी, शिक्षक, आरोग्य सेविका यांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ऑक्सीमीटर, पल्स मीटर व थर्मामीटर च्या साह्याने नागरिकांची आरोग्य तपासणी करायची आहे. ज्या नागरिकांना तपासणीवेळी काही लक्षणे जाणवतील त्यांना तसेच ज्यांचे शरीराचे तापमान ३८ सेल्सिअस पेक्षा जास्त आहे व पल्स ९५ पेक्षा कमी आहेत. अशा सर्व नागरिकांची स्वाब तपासणी होणार आहे.

या तपासणीचा उद्देश जेणेकरून कोरोनाचा भविष्यात वाढणारा धोका टळेल व कोरोना नियंत्रणात येण्यास मदत होईल. हाच असून सर्व नागरिकांनी आपली वस्तुनिष्ठ माहिती तपासणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना द्यावी. कोणतीही लपवाछपवी करु नये.ज्यायोगे प्रशासनाला योग्य ती उपाययोजना करता येईल. त्यासाठी योग्य ते सहकार्य करावे. तसेच या तपासणीच्या दिवशी कोणीही बाहेर जाऊ नये, घरीच थांबून राहावे असे आवाहन बंडगर यांनी नागरिकांना केले आहे.

कोरोनाच्या या संकटकाळात जिल्हा परिषद सदस्य या नात्याने बंडगर यांनी सुरुवातीपासूनच लोकांमध्ये जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, कोरोना रुग्णांच्या वार्डमध्ये जाऊन प्रत्यक्ष स्थळपाहणी व मिळणाऱ्या सेवासुविधा याविषयी रुग्णांशी चर्चा, आरोग्य कर्मचाऱ्याना आवश्यक साहित्य पुरवठा करणे याकामी पुढाकार घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.