अंतिम वर्षाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलमधून प्रवासाला मुभा..!

A

| मुंबई | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अंतिम परीक्षा घेण्याबाबत नियोजन सुरू झाले आहे. परीक्षा सहज सोपी व तासाभराची त्यात MCQ पद्धतीची असल्याने विद्यार्थ्याना त्याचा जास्त दबाव देखील येणार नाही. त्या अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या मुंबई तील विद्यार्थ्याना दिलासादायक बाब समोर येत आहे. अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून विद्यार्थ्यांना लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सध्या बंद असून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल धावत आहेत. विद्यार्थी ओळखपत्र तसंच हॉल तिकीट दाखवत लोकलने प्रवास करु शकणार आहेत. मध्य रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या तसंच स्पर्धात्मक परीक्षेच्या विद्यार्थ्यांना विशेष उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ओळखपत्र आणि हॉल तिकीटच्या आधारे विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त बुकिंग काऊंटर्स सुरु केली जाणार आहेत अशी माहितीही मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. रेल्वेने इतरांना स्थानकांवर गर्दी करु नका असं आवाहन करताना प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *