अभिनव : सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत

| मुंबई | सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड 19) करिता आज 3 लाख 37 हजार 240 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

या मदतीच्या रुपाने स्वीय सहाय्यकांनी सामाजिक बांधिलकी जपत कोविड 19 विरुद्धच्या लढाईत योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी या मदतीसाठी सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांना धन्यवाद दिले आहेत.
ज्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करावयाची आहे त्यांच्यासाठी माहिती खालीलप्रमाणे आहे.

इंग्रजीत-
Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India,
Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19
बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720
स्टेट बँक ऑफ इंडिया,
मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *