अभिमानास्पद : पहिल्या स्वदेशी अँटी रेडिएशन मिसाइल रुद्रमची यशस्वी चाचणी..!

| नवी दिल्ली | भारताने शुक्रवारी पहिल्या स्वदेशी अँटी रेडिएशन मिसाइल रुद्रम-1 यी यशस्वी चाचणी केली. या मिसाइलला ओडिशातील बालासोरच्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंज (आयटीआर)वरुन सकाळी 10.30 वाजता सुखोई-30 फायटर जेटमधून सोडण्यात आले.

या मिसाइलला डिफेंस रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनाइजेशन (डीआरडीओ) ने इंडियन एअरफोर्ससाठी तयार केले आहे. ही आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. शत्रूचे रडार आणि सर्वेलंस यंत्रणेस चकमा देऊ शकते. तसेच, आवाजाच्या दुप्पट वेगाने लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे.

याचे वैशिष्ट्यः

✓ ही पहिली स्वदेशी मिसाइल आहे, जी कोणत्याही प्रकारचे सिग्नल आणि रेडिएशन ओळखू शकते आणि क्षेपणास्त्रांचा नाश देखील करू शकते.

✓ ही रेडिओ फ्रीक्वेंसी सोडणाऱ्या किंवा रिसीव करणाऱ्या कोणत्याही टारगेटला निशाना बनवू शकते.

✓ याची लॉन्‍च स्‍पीड 0.6 ते 2 मॅक म्हणजेच 2469.6 किलोमीटर प्रती तास आहे.

✓ याची रेंज फायटर प्लेनच्या उंचीवर अवलंबून आहे. याला 500 मीटर पासून 15 किलोमीटरपर्यंच्या उंचीवरुन लॉन्च करता येते. यादरम्यान 250 किलोमीटर क्षेत्रातील कोणत्याही टार्गेटला उडवण्यास सक्षम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *