
| कल्याण | कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या अभय योजने चा लाभ शहरातील सर्व सामान्य नागरिक, कामगार वर्ग व करदाते यांना अधिकाधिक मिळावा यासाठी अभय योजनेचा कालावधी वाढवण्यात यावा अशी मागणी कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ दादा भोईर यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांना पत्राद्वारे केली आहे.
आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात आमदार भोईर यांनी सामान्य नागरीकांची व्यथा मांडत अभय योजनेचा कालावधी वाढवण्यात यावा अशी मागणी केली आहे. कोरोना काळात लॉकडाऊन मुळे अनेकांना आर्थिक मंदीची झळ बसली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने तसेच व्यवसायही ठप्प झाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. कुटुंबाच्या दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करतांना नाकी नऊ निघत आहेत. त्यामुळेच अभय योजनेचा कालावधी वाढवल्यास सामन्यांना थोडाफार का होईना दिलासा मिळेल अशी आशा आमदार विश्वनाथ दादा भोईर यांनी व्यक्त केली आहे..
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री