अभिमानास्पद : बकरी ईद निमित्त कुर्बानी ऐवजी केले रक्तदान..!

| पुणे | पुण्यातील काही मुस्लीम बांधवांनी जुन्या परंपरेला छेद देत बकऱ्याची कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान करून बकरी ईदचा सण साजरा केला. रक्तदान करणाऱ्या मुस्लिम बांधवांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पुण्यातील साने गुरुजी स्मारक येथील एका हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. संपूर्ण देशभरात बकरी ईद मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी बकऱ्याची कुर्बानी देऊन मुस्लिम बांधव हा सण साजरा करतात. तशी परंपरा मुस्लिम समजत आहे.

परंतु, पुण्यातील काही मुस्लीम बांधवांनी या परंपरेला छेद देत बकऱ्याची कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान करू बकरी ईद साजरी केली आली. सध्या कोरोनाच्या संकटकाळात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे राज्य शासन, लोकप्रतिनिधी आणि डॉक्टरांकडून रक्तदानाचे आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही मुस्लिम बांधवानी यंदा बकऱ्यांची कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने या अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

मुस्लिम सत्यशोधक मंडळ ही महाराष्ट्रातील मुस्लिम समाजातील प्रबोधनासाठी काम करणारी संघटना आहे. ही संघटना हमीद दलवाई यांच्या पुढाकाराने मार्च २२, १९७० रोजी पुण्यात स्थापन झाली. मंडळाच्या जाहीरनाम्यात भारतातील हिंदू आणि मुसलमान समाजातील प्रबोधनाची दरी भरून काढून खऱ्या अर्थी ह्या दोन्ही समाजांचे संबंध सुधारणे, राष्टीय एकात्मता निर्माण होणे आणि भारतीय प्रजासत्ताकात मुस्लिम समाज राष्ट्रजीवनाचा एक सन्माननीय सदस्य नांदणे, स्त्री-पुरुष-समानता निर्माण होणे ह्या निकडींतून मंडळाची स्थापना करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *