| मुंबई | मेट्रो कारशेड कांजूरमार्गला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यावरून राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलांचे ऐकून हा अधोगतीला जाणारा निर्णय घेतला असे म्हंटले जात आहे. त्या वर विरोधी पक्षाकडून चौफेर टीका होत असताना, राज्य सरकारच्या या निर्णयाला मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मात्र पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा दिल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून त्यांचं कौतुक करण्यात आलंय.
यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. ते म्हणाले, सरकारच्या चांगल्या कामाला ‘दिलसे’ पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटला.
आमच्या वास्तव भूमिकेवरही मोठं होण्यासाठी बोलत असल्याची टिका करणारे आणि सरकारला केवळ विरोधासाठी विरोध करणारे नेते विरोधी पक्षात भरपूर आहेत, असा टोलाही रोहित पवार यांनी विरोधकांना लगावला आहे.
एकंदरीत अमित ठाकरे यांच्या भूमिकेने विरोधकांची टीका करण्याची मनीषा धुळीस मिळाली आहे हे नक्की.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .