अमेरिकेतील निवडणुकीत ‘ हा ‘ मराठी माणूस झाला आमदार..!

| वॉशिंग्टन DC | अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये रोमांच शिगेला पोहोचला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डेमोक्रिटिकचे उमेदवार जो बायडन विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. या निवडणुकीच्या धामधुमीत एका मराठमोळ्या नावाचा डंका अमेरिकेत वाजला आहे. श्रीनिवास ठाणेदार यांनी मिशिगन राज्यातून शानदार विजय मिळवत आमदारकी मिळवली आहे.

श्रीनिवास ठाणेदार मिशिगन यांनी राज्यातून यावर्षी ‘हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह’ म्हणजेच विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांचं एक यशस्वी उद्योजक – ‘ही श्रीची इच्छा’ प्रसिध्द आत्मचरित्र आहे. आजपर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचे मोठे देणगीदार असलेले श्रीनिवास ठाणेदार आता पक्षाचे लोकनियुक्त प्रतिनिधी झाले आहेत.

24 व्या वर्षी अमेरिकेत गेलेल्या ठाणेदार यांनी आपला झेंडा अमेरिकन राजकारणात रोवला आहे. त्यांनी 25 हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यांना 93 टक्के मतं मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवाराला केवळ 6 टक्के मतं मिळाली. त्यांनी 2018 मध्ये राज्याच्या गव्हर्नरपदासाठी त्यांनी निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांना दोन लाखांहून जास्त मतं मिळाली होती. आत्ताच्या निवडणुकीत त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *