अमेरिकेतील संशोधन : आयोडीन मुळे १५ सेकंदात निष्क्रीय होतो कोरोना विषाणू..

| मुंबई | अतिशय वेगाने पसरणा-या कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 30,984,415 वर गेली आहे. तर 961,400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी, लस शोधण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी संशोधन सुरू असून नवनवीन माहिती ही सातत्याने समोर येत आहे. कोरोनाबाबत संशोधकांनी एक दावा केला आहे.

आयोडीनमुळे 15 सेकंदात कोरोनाचा नष्ट होणार असल्याचा मोठा खुलासा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे. अमेरिकेत करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, आयोडीनने नाक आणि तोंड धुतल्यास कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करता येऊ शकतो. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट स्कूल ऑफ मेडिसीनच्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. मात्र याआधी करण्यात आलेल्या काही रिसर्चमध्ये आणि जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संदर्भातील हा दावा फेटाळून लावला आहे.

लोकांनी आयोडीनने नाक धुतल्यास कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता कमी होत असल्याचं रिसर्चमध्ये म्हटलं आहे. तसेच संशोधकांनी प्रयोगशाळेत कोरोना व्हायरसच्या एक नमुन्यावर तीन वेगवेगळ्या सांद्रतेचे अँटीसेप्टिक पोविडोन-आयोडीनचे सोल्यूशन टाकले. पोव्हिडोन-आयोडीन 0.5 टक्के सांद्रतेच्या सोल्यूशनमध्ये कोरोना व्हायरस निष्क्रिय करण्यासाठी फक्त 15 सेकंदाचा कालावधी लागला. त्यानंतर संशोधकांकडून नाक आणि तोंड आयोडीनने धुतलं तर कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *