अमेरिका-युरोपप्रमाणे गांजाला कायदेशीर मान्यता द्यावी..

| मुंबई | सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शनबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच ख्यातनाम लेखिका तस्लिमा नसरीन यांनी अमेरिका-युरोपप्रमाणे गांजाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी केली आहे.

तस्लिमा नसरीन यांचं एक ट्विट सध्या चर्चेत आहे. हे ट्विट त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं आहे. ‘अमेरिकेत काही राज्यांमध्ये पूर्णपणे तर काही ठिकाणी अंशत: गांजाला कायदेशीर मान्यता देण्यात आलीये. युरोपमध्येही वैद्यकीय कारणांसाठी गांजाचा वापर करण्याची परवानगी आहे. गांजाला कायदेशीर परवानगी मिळायला हवी. ताण आणि वेदना कमी करण्यासाठी ज्याला गरज आहे त्याला गांजाच्या वापराची परवानगी असावी. मी स्वत: ‘स्मोक’ करत नाही. मला याची गरज नाही. पण मी इतरांचा विचार करतेय’, असं म्हणत तस्लिमा नसरीन यांनी गांजाला कायदेशीर परवानगी देण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.