अमर महल जंक्शन जवळची वाहतूक कोंडी फुटली, आता चेंबूर ते घाटकोपर फक्त १५ मिनिटात..!

| मुंबई | पूर्व द्रुतगती महामार्गावरील गजबजलेल्या अमर महल जंक्शनची अखेर वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. या मार्गावर अडथळा ठरणारी बांधकाम महापालिकेने नुकतीच जमीनदोस्त केली. यामुळे ६० फुटांचा रस्ता आता १२० फुटांचा केला जाणार आहे. त्यामुळे चेंबूर ते घाटकोपर हा सध्या ४५ मिनिटांचा प्रवास वाहन चालकांना अवघ्या १५ मिनिटांत पार करता येणार आहे.

पूर्व आणि पश्चिम उपनगराकडे जाणारी वाहने अमर महल जंक्शन येथून वळतात. मात्र या मार्गावर काही दुकाने व निवासी गाळे असल्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण लांबणीवर पडले होते. महापालिकेने येथील १७७ दुकानदार आणि ४० रहिवाशांचे चेंबूर, टिळक नगर येथे पुनर्वसन केले होते. परंतु, येथील दुकानदाराने पालिकेविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. तिथे पालिकेच्या बाजूने निकाल लागल्यामुळे ही बांधकामे पाडून रस्ता मोकळा करण्यात आला.

या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अखेर सहा वर्षांनंतर सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यानुसार उर्वरित ५९ बांधकाम महापालिकेने गुरुवारी पाडली. सध्या चेंबूर ते घाटकोपरपर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना ४५ मिनिटांचा कालावधी लागत आहे. मात्र घाटकोपर-माहुल मार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर अवघ्या १५ मिनिटांत अमर महल जंक्शन येथून घाटकोपरला पोहोचता येणार आहे. १७७ दुकानदार आणि ४० रहिवाशांचे चेंबूर, टिळकनगर येथे पुनर्वसन केले होते. परंतु, येथील दुकानदाराने पालिकेविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *