अर्णव गोस्वामी नंतर आता कंगना राणावत वर देखील विधिमंडळात हक्कभंग दाखल, सभापतींच्या निर्णयाकडे लक्ष..!

| मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रानौत आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये ट्विटर वॉर सुरु आहे. हे वॉर आता शिगेला पोहोचलं आहे. विधानसभेत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडल्यानंतर आता विधानपरिषदेत काँग्रेस नेते भाई जगताप यांनी कंगना रनौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला.

ही नटी ड्रग्ज घेत असल्याचं अध्ययन सुमनने २०१६ मध्ये एका मुलाखतीत सांगितलं होतं. ही महिला राज्याबद्दल बोलते, तिच्याविरोधात हक्कभंग आला आहे, असं भाई जगताप यावेळी म्हणाले. आता सभापती यावर काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल.
दरम्यान दोन दोन हक्कभंग दाखल झाले असल्याने सभापती काय निर्णय घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *