अशोक चव्हाण यांना हटवा नि एकनाथ शिंदे यांच्याकडे अध्यक्षपद द्या – मराठा आरक्षणावरुन विनायक मेटे यांची मागणी..!

| पुणे | मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत सरकार झोपेचं सोंग करतंय, असा गंभीर आरोप शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. तसेच राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना हटवण्याची मागणीही विनायक मेटे यांनी केली.

विनायक मेटे म्हणाले, “मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर समस्यांबाबत सरकार झोपेचं सोंग करतंय. त्यामुळं सरकारला जागं करावं लागणार आहे. त्यासाठी आंदोलन करावंच लागणार आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण विषयक उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून अशोक चव्हाण यांना हटवावे.” अशोक चव्हाण यांच्याऐवजी मंत्री एकनाथ शिंदे किंवा इतर सक्षम मंत्र्याची अध्यक्षपदी नियुक्त करावी, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली.

मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मराठा समन्वय समितीची महत्वाची राज्यव्यापी बैठक सुरु आहे. शिवसंग्रामचे संस्थापक आणि आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वात ही बैठक होत आहे. या समन्वय समितीत राज्यातील वेगवेगळ्या १० ते १२ संघटनांचा सहभाग आहे. बैठकीत मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्न आणि आरक्षणासंदर्भात आंदोलनाच्या रणनीतीवर चर्चा झाली. मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र यासंदर्भात राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप समन्वय समितीने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *