अहिल्याबाईंच्या नावाचा गैरवापर; एकता कपूरच्या व्हर्जिन भास्कर 2’ ह्या वेब सिरीजवर धनगर समाज संतप्त,

| इंदूर | ‘झी५’ आणि ‘अल्ट बालाजी’ या ‘अ‍ॅप्स’वर प्रसारित होणार्‍या ‘व्हर्जिन भास्कर -२’ या वेब सिरीजमध्ये ‘पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी गर्ल्स हॉस्टेल’चे नाव आणि त्यातील प्रसंग दाखवण्यात आले आहेत. या मलिकेत शारीरिक संबंधांचा विषय मांडण्यात आला आहे. अशा मालिकेत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांचा अपमान करण्यात आला आहे. या मालिकेची निर्मिती एकता कपूर यांच्या ‘बालाजी टेलिफिल्म’ने केली आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंहजीराजे होळकर महाराज यांनी एकता कपूर यांना पत्र पाठवून याविषयी समज देत चूक सुधारून क्षमा मागावी, अशी मागणी केली आहे. तसेच महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या नेत्या निहिराका खोंदले यांनीही याचा विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही याची नोंद घेत एकता कपूर यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस बबनराव मदने यांनी ‘कारवाई न झाल्यास संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी दिली आहे.

https://twitter.com/thelokshakti/status/1302859712229044225?s=19

दरम्यान याबाबत अहिल्याबाई होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंहजीराजे होळकर महाराज यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की,

१. अशा प्रकारचे नाव देण्याच्या तुमच्या विकृत मानसिकतेचा आम्ही निषेध करतो. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी यांच्या नावाचा असा वापर करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला ?

२. आज तुम्ही ज्या स्वातंत्र्यामध्ये रहात आहात ते स्वातंत्र्य मिळवून देण्याचे कार्य अहिल्यादेवी यांच्या सारख्यांच्या बलीदानामुळे झाले आहे. ते तुम्ही विसरला आहात.

३. तुमच्याकडून झालेल्या अवमानामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. एक महिला असून तुम्ही देशाच्या एका महान महिलेचा केलेला अवमान तुम्हाला शोभत नाही. तुम्ही केलेल्या या चुकीसाठी तुम्ही क्षमा मागावी आणि ती चूक सुधारावी, तसेच यापुढे अशी चूक करू नये.

काय आहे ही व्हर्जिन भास्कर 2’ची कथा : 

‘व्हर्जिन भास्कर 2’ ही एक बोल्ड सीरिज आहे. यात अभिनेता अनंत जोशी मुख्य भूमिकेत आहे. त्यात त्याने भास्कर त्रिपाठीची भूमिका साकारली आहे. या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये भास्कर आणि त्याच्या व्हर्जिनिटीची कहाणी दाखवली गेली होती. दुस-या सीझनमध्ये हीच कथा समोर नेत देशातील पुरूषांच्या सेक्युअ‍ॅलिटीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *