आज शिक्षक दिन, त्या निमित्ताने प्रसिद्ध व्यक्तींचे हे आहेत अनमोल विचार..!

आज शिक्षक दिन..! भारतात पहिला शिक्षक दिन १९६२ मध्ये साजरा केला गेला. आता शिक्षक दिन याच दिवशी साजरा करण्यामागचे नेमके कारण काय तर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या कर्तृत्त्वाच्या बळावर भारताचे राष्ट्रपतीपद भुषविले. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनात त्यांचे स्थान कायम होते. त्यामुळे त्यांनी डॉ. राधाकृष्णन यांचा वाढदिवस साजरा करायचे ठरविले. तेव्हापासून ५ सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

याच शिक्षक दिनानिमित्त प्रसिद्ध व्यक्ती यांचे शिक्षकांबाबतचे अनमोल विचार..!

सर्वपल्ली राधाकृष्णन – ज्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करत असतो, अगदी त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोर्‍या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात. आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हे आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात.

महात्मा गांधी – मुलांना मुक्तपणे विचार करायला कोण शिकवू शकतो असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे शिक्षक. सर्व बाजूंचे विचार आत्मसात करून स्वत:चा नवा विचार करायला शिकवणं हे शिक्षकाचं काम आहे.

साने गुरूजी – मुलांभोवती जितके स्वच्छ, पवित्र, मोकळेपणाचे, आनंदाचे वातावरण तितके मुलांचे जीवन सुंदर. मुले सुधारायला पाहिजे असतील तर त्यांच्या भोवतालची सृष्टीच बदला. खरा शिक्षक मुलांना भूतकाळाची कल्पना देऊन भविष्याच्या दरवाजापर्यंत आणून ठेवतो.

स्वामी विवेकानंद – उत्तम माणूस घडवणं हे शिक्षणाचं ध्येय असावं. मुलांची वैचारिक, शारिरीक आणि अध्यात्मिक प्रगती करण्याचं कौशल्य शिक्षक विकसित करू शकतात.

बिल गेट्स – तंत्रज्ञान हे केवळ एक साधन आहे. मुलांना एकत्र काम करणे आणि त्यांना प्रेरणा देण्याच्या दृष्टीने शिक्षक हा सर्वात महत्वाचा आहे.

दलाई लामा – सहिष्णुता च्या सराव मध्ये, एक शत्रू सर्वोत्तम शिक्षक आहे.

अल्बर्ट आईन्स्टाईन – सृजनशील अभिव्यक्ती आणि ज्ञानात आनंद जागृत करण्यासाठी शिक्षकांची सर्वोच्च कला आहे.

डॉ. रघुनाथ माशेलकर – विद्यार्थ्यांच्या सर्व क्षमता एकत्र करून त्याला दिशा देण्याचं काम शिक्षक करतो. असे आदर्श शिक्षक मिळाल्यानेच माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. माझं आयुष्यबदलून गेलं.

ब्रॅड हेन्री – एक चांगला शिक्षक आशा प्रोत्साहित करू शकतो, कल्पनाशक्ती पेटवू शकतो, आणि शिकण्याचे प्रेम विकसित करू शकतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *