आपण Paytm User आहात, मग हे वाचाच..! आपले पैसे आहेत सुरक्षित..?

| मुंबई | गुगल प्ले स्टोरवरून मोबाइल पेमेंट अ‍ॅप पेटीएम काढून टाकण्यात आलं आहे. त्यानंतर ग्राहकांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांचे पैसे सुरक्षित आहेत का? तर याबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे.

आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी पेटीएम आणि पेटीएम फर्स्ट गेम हे दोन्ही अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहे. वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या मालकीचे Paytm आणि Paytm First Game हे दोन अ‍ॅप प्ले स्टोअरवर दिसत नाही आहे. पेटीएम मनी, पेटीएम मॉल आणि अन्य कंपनीच्या मालकीचे इतर अ‍ॅप्स प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.

पीटीएम हे देशातील आघाडीचे पेमेंट आहे. कंपनीच्या दाव्यानुसार पेटीएमचे ५० मिलियन सक्रीय युजर्स आहेत. त्यामुळे या सर्व युजर्सचे पैसे App प्ले स्टोअरवरून काढून टाकल्यावर सुरक्षित आहेत का असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला गेला. दरम्यान याबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

त्यांनी असे ट्वीट केले आहे की, ‘पेटीएमल अँड्रॉइड अ‍ॅप काही काळाकरता नवीन डाऊनलोड आणि अपडेटसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नसेल. लवकरच ते परत येईल. तुमचे सर्व पैसे सुरक्षित आहेत. तुम्ही नेहमीप्रमाणे अ‍ॅप वापरू शकता.’ पेटीएमने आणखी एक ट्वीट करत ग्राहकांना खात्री दिली आहे की त्यांचे पैसे आणि शिल्लक रक्कम सेफ आहे

गुगल प्ले स्टोअरने हे अ‍ॅप जुगारासंबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काढून टाकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुगलनं याआधी ऑनलाइन जुगाराला परवानगी देत नाही किंवा अशा अ‍ॅप्सना समर्थन देत नाही, असे सांगितले होते. त्यानंतर हे दोन्ही अ‍ॅप काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे आता गुगल प्ले स्टोरवर Paytm उपलब्ध नाही. त्यामुळे नवीन युझर्स हे अ‍ॅप डाऊनलोड करू शकत नाहीत. मात्र तुम्ही आधीपासूनच तुमच्या मोबाइलमध्ये हे अ‍ॅप डाऊनलोड केलेलं असेल तर आता तुम्ही त्याचा वापर करू शकता की नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

दरम्यान, नुकत्याच उपलब्ध माहितीनुसार Paytm ऍप पुन्हा गुगल प्ले वर उपलब्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *