आपले पगाराचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत आहे, मग हे मिळतात आपल्या विम्याचे लाभ..!

| पुणे / विनायक शिंदे | शासकीय , निमशासकीय कर्मचारी , अधिकारी यांना पगार बँक खात्याशी संलग्न विमा योजनांबाबत माहिती द्यावी असे निर्देश महाराष्ट्र शासन वित्त विभागाने सर्व प्रशासकीय विभागांना दिले आहेत. राज्य कर्मचारी व अधिकारी यांचे पगार खाते कोणत्या विशिष्ट बँकेतच असावे अशा प्रकारचे कोणतेही निर्देश वित्त विभाग देऊ शकत नाही. कोणत्या बँकेत पगार खाते असावे याचा निर्णय कर्मचारी किंवा अधिकारी यांनी वैयक्तिकरित्या घ्यावयाचा आहे.

बँक खात्याशी संलग्न असणाऱ्या अपघात विमा विषयक योजना या अधिकारी , कर्मचारी यांच्या वैयक्तिक फायदयाच्या आहेत. बँकांकडून यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. पगार बँक खाते सुरू झाल्यानंतर या अपघात विमा योजना आपोआप लागू होत असतात. कर्मचारी, अधिकारी यांना या योजनांची माहिती नसल्या कारणाने कर्मचारी , अधिकारी या योजनांपासून वंचित राहू शकतात. वित्त विभागाने ३१ ऑगस्ट २०२० व ८ ऑक्टोबर २०२० रोजी मार्गदर्शक परिपत्रक काढून सर्व प्रशासकीय विभागांना कर्मचारी व अधिकारी यांना पगार बँक खाते संलग्न अपघात विमा योजनांची माहिती करुन द्यावे असे निर्देश दिले आहेत.

काही राष्ट्रीयकृत बँकांमधील पगार खाते संलग्न अपघात विमा योजनांची माहिती :

✓ बँक ऑफ महाराष्ट्र , बँक ऑफ बडोदा पगार खाते

१. अपघाती निधन : 40 लाख रु
२. कायम अपंगत्व : 40 लाख रु
३. अंशत : अपंगत्व : 20 लाख
४. अपघाती उपचारासाठी : 1 लाख रु
५. हवाई अपघात : 1 कोटी
६. नैसर्गिक मृत्यू : मदत नाही
७. मेडिक्लेम : कोणत्याही मदत नाही
_________________________

✓ बँक ऑफ इंडिया पगार खाते असेल तर..

१. अपघात विमा : 30 लाख
२. पूर्ण अपंगत्व. 30 लाख
३. कमी अपंगत्व : 15 लाख
४. मेडिक्लेम .कोणतीही मदत नाही
५. नैसर्गिक मृत्यू . कोणतीही मदत नाही
६. विमान अपघात : १ कोटी
_________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *