आयुर्वेदामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

| मुंबई | राज्यातील कोविड-19 परिस्थिती पाहता आपल्यामधील प्रतिकार शक्ती नैसर्गिक पद्धतीने वाढविण्यासाठी आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक संकल्पना समोर आली आहे. होमिओपॅथी आयुर्वेद युनानी यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. हे दिसून येत असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांच्या हस्ते आयुष इम्युनिटी क्लिनिक होमिओपॅथी आयुर्वेद युनानी ऑनलाईन उद्घाटन सोहळा आज पार पडला. यावेळी आयुष टास्क फोर्स, कोविड-19 चे अध्यक्ष आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने, डॉ. मनोज राका,डॉ. अमित दवे,डॉ.कुलदीप कोहली, डॉ. शुभा राऊळ, डॉ.राजश्री कटके, डॉ संजय लोंढे, डॉ विनायक टेंभुर्णीकर, डॉ जुबेर शेख आदी उपस्थित होते.

श्री.देशमुख म्हणाले की, इम्युनिटी क्लिनिक प्रकल्पाला महाराष्ट्र कोविड 19 आयुष टास्क फोर्सकडून परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता राज्यात सुमारे 650 क्लिनिक सुरु करण्यात आली असून 500 अधिक क्लिनिक सुरु करण्यात येणार आहेत. कोविड- १९ या आजारावर अजूनही औषधे किंवा लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे प्रतिकार शक्ती चांगली असल्यास आजार न होणे किंवा झाल्यास लवकर बरा होण्यास मदत होत असल्याचे जगभरातील संशोधनातून सिद्ध झाले आहे. याच धर्तीवर प्रतिकार शक्ती नैसर्गिक पद्धतीने वाढविण्यासाठी ही आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिकची संकल्पना समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *