इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेमार्फत रतन टाटा यांना जीवनगौरव तर मुंबई मनपा आयुक्त यांना कोविड क्रूसेडर पुरस्कार देऊन गौरव..!

| मुंबई | कोरोना महामारीच्या विपरीत काळात जनसामान्यांची सेवा करणार्‍या भारत व अमेरिकेतील दानशूर व्यक्ती व उद्योग संस्थांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत कोविड क्रूसेडर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेने आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळ्यात टाटा समूहाचे मानद प्रमुख रतन टाटा यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, शेफ विकास खन्ना, हौस्टनचे महापौर सिल्व्हेस्टर टर्नर, गोदरेज समूह, महिंद्रा अँड महिंद्रा, सेवाटेकच्या सोनी कक्कर, वालीस बँकेचे आसिफ डाकरी व पेरेनियल्स अँड सुदरलँडचे अमोल बिनिवाले यांना कोविड योद्धे म्हणून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डेव्हिड रॅन्झ, इंडो अमेरिकन चेंबरच्या अध्यक्षा राज्यलक्ष्मी राव, पश्चिम विभागाचे अध्यक्ष नौशाद पंजवानी, निवड समितीचे सदस्य आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.