इंदापूर तालुक्यात दि.१२ सप्टें ते २० सप्टेंबर अखेर ९ दिवस जनता कर्फ्यु : राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची माहिती.

| इंदापूर/ महादेव बंडगर | कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी दि.१२ सप्टेंबर ते २० सप्टेंबर अखेर इंदापूर तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

तालुक्यात कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रसार पाहता कोरोनाची साखळी तोडणे खूप गरजेचे होते. व्यापारी पेठा बंद करून गर्दी नियंत्रित करण्यासाठी लॉक डाऊन बाबत काही कठोर निर्णय घेणे गरजेचे होते.आणि त्याच अनुषंगाने दिनांक १२ सप्टेंबर ते २० सप्टेंबर अखेर जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या संदर्भामध्ये सर्व व्यापारी संघटना व पदाधिकारी यांची बैठक इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये सर्वांच्या अडचणी ऐकून घेण्यात आल्या आणि त्यानुसार सर्वानुमते जनता कर्फ्यू लागू करण्याचे निश्चित करण्यात आले.

या कालावधीमध्ये तालुक्यातील जनतेने प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संपूर्ण तालुका वासियांना केली आहे .या लॉक डाऊन च्या यशस्वीतेनंतर खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याची पुढील दिशा ठरणार आहे. त्यामुळे कोणताही हलगर्जीपणा न दाखवता. काटेकोरपणे लॉक डाऊन यशस्वी करून दाखवावा असे आवाहन भरणे यांनी नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *