इंदापूर तालुक्यामध्ये कोरोना मुळे एवढे मृत्यू होऊन आमदार गप्प का? – भाजपचे तालुकाध्यक्ष ऍड. शरद जामदार यांचा सवाल..

| इंदापूर / महादेव बंडगर | इंदापूर तालुक्यात कोरोनामुळे पन्नास पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, याला जबाबदार कोण? मृत्यूचे सत्र असे रोजच चालू राहिले तर येणार काळ इंदापूरकरांची चिंता वाढवणारा असेल. रोज कोरोनामुळे कोणाचा तरी मृत्यू झाल्याची बातमी ऐकण्यास मिळत आहे. या सर्व परिस्थितीला कोण जबाबदार आहे.असा सवाल भाजपचे तालुकाध्यक्ष ऍड. शरद जामदार यांनी केला आहे.

तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला आपल्या जबाबदारीची कसलीच जाणीव नाही. अशा लोकप्रतिनिधीचा, मी जाहीरपणे निषेध करतो.
सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस यंत्रणा, प्रशासन हे सर्व आपले कर्तव्य बजावण्याचे काम चोख करत आहेत. परंतु या कामी उत्तम नियोजन करण्याची जबाबदारी तालुका लोकप्रतिनिधींची होती . वेळोवेळी शासन दरबारी प्रयत्न करून संकटाचा सामना करण्यासाठी सुव्यवस्थित नियोजन करणे गरजेचे असते.

जन सामान्याची गरज लक्षात घेता सेवाभावी संस्थांना आवाहन करणे गरजेचे होते आणि एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आपली भूमिका लोकाभिमुख समर्पित ठेवणे गरजेचे असताना. लोकप्रतिनिधीची भूमिका ही मुख्य प्रश्न बाजूला ठेवून नुसत्या जाहिराती, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून केल्या. याचा तीव्र शब्दात मी जाहीरपणे निषेध करतो.असेही जामदार म्हणाले. ज्यांच्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू कोरोना सारख्या आजाराने झाल्यामुळे, त्यांची झालेली वाताहात, कोसळलेले दुःख, त्यांना कोणत्या मदतीची गरज आहे का? याकडे लोकप्रतिनिधींचे कोणतेही लक्ष असल्याचे दिसत नाही. अशा बेजबाबदार व्यक्तीला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.अशी जहरी टीका जामदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *