| मुंबई | आंतरराज्य व राज्यांतर्गत प्रवासासाठी ई-पास किं वा कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले होते. मात्र असे असूनही राज्यात अटी सध्या तरी अटी शिथिल होणार नसल्याचे दिसत आहे. पुढील निर्णय येईपर्यंत ई-पास आवश्यक असणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्पष्ट केले आहे.
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आणि कोरोनावर नियंत्रण मिळवता यावे यासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र आता केंद्राने ई-पासची अट रद्द केली आहे. यानंतर राज्यातील ई-पासही रद्द होईल अशी शक्यता होती. दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मगच निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले होते.
यानंतर गृहमंत्री अनिल देखमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली. त्यानंतर पुढील आदेश येईपर्यंत ई-पास आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. बहुधा १ सप्टेंबरपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.
राज्यात अद्यापही दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी पोलिसांच्या ई-पासचे बंधन कायम आहे. ई-पास रद्द करण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे. नुकतीच केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली. यानुसार आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत प्रवासी व वस्तूंच्या वाहतुकीसाठी कोणत्याही परवान्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र यानंतररही राज्यातील अटी शिथिल करण्यात आलेल्या नाहीत.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .