| कराड | मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाणांना हटवावं आणि एकनाथ शिंदेना मराठा समितीचे अध्यक्षपद द्यावं असं मत आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी कराड इथं व्यकत केलं आहे. यावेळी अशोकराव चव्हाणांनी मराठा समाजाला थर्ड लावला. चंद्रकांत पाटलांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न योग्य पध्दतीने हाताळला होता त्यामुळे अशोक चव्हाणांना पदावरून काढून टाका अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे.
शिवसेना – भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाचा प्रश्न योग्य पध्दतीने हाताळला होता. मात्र, सध्याचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाचं नुकसान झालं असल्याने त्यांना हटवावं. अशात मोठं योगदान असलेल्या एकनाथ शिंदे यांची अध्यक्षपदी असावे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडेही केलेली होती असं आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विनंती केली होती की, एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाची जी उपसमिती आहे, त्यांचे त्यांना अध्यक्ष करा. कारण ज्यावेळेला भाजप- शिवसेनेचे सरकार होतं. त्यावेळेच्या उपसमितीत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनी खूप चांगल्या प्रकारे काम करत होते.
मराठा समाजाच्या मुले- मुलींच्यासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये पहिले वसतिगृह जे झाले ते एकनाथ शिंदेनी केले. यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. परंतु आमची विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्यच केली नाही. त्यांनी अशोकराव चव्हाणांना आणून बसवलं, त्यांनी मराठा समाजाला थर्ड लावला अशा शब्दात नरेंद्र पाटील यांनी चव्हाणांनावर टीका केली आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .