एस टी चा नवा फंडा, दोन आसनांमध्ये मध्ये बसविणार पडदे..!

| मुंबई | सर्वसामान्यांच्या लालपरी मध्ये आता पडदे बसवण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्याची चाचपणी एसटीच्या दापोडी येथील कार्यशाळेत सुरू होणार असल्याची माहिती महामंडळाने दिली.

एसटी महामंडळाकडून जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बस चालवताना ४४ ऐवजी २२ प्रवाशांनाच प्रवासाची मुभा दिली आहे. त्यामुळे एसटीचे उत्पन्न कमी झाले आहे. ही परिस्थिती पुढेही सुरू राहिल्यास आर्थिक नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पन्न वाढावे व खर्च बचतीसाठी यावर उपाय म्हणून पूर्ण प्रवासी क्षमतेने एसटी चालवण्याच्या विचारात महामंडळ आहे. त्यासाठी दोन आसनांवर बाजूबाजूला बसलेल्या प्रवाशांमध्ये पडदे बसवण्यात येणार आहेत.

यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी हा प्रस्ताव गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे दोन बसमध्ये पडदे बसवण्यात आले असून राज्य सरकारकडून मंजुरी मिळताच त्याची चाचपणी केली जाणार असल्याचे सांगितले.

टाळेबंदीआधी एसटीच्या १८ हजार बसमधून दररोज ६० ते ६५ लाख प्रवासी प्रवास करत असल्याने त्यातून दररोज २१ ते २२ कोटी रुपये उत्पन्नही मिळत होते. परंतु गेल्या पाच महिन्यांत हेच उत्पन्न पूर्णपणे बुडाले. त्यामुळे एसटी पूर्ण क्षमतेने चालवतानाच खर्चातही बचत करण्याचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *