ऑगस्ट पेन्शन क्रांती; महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनची मोहीम..!

| मुंबई / प्राजक्त झावरे पाटील | मागील अनेक दिवसापासून राज्य व राष्ट्रीय पातळीवर १ नोव्हेंबर २००५ नन्तर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने लादलेली एनपीएस (नॅशनल पेन्शन स्कीम) रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनने अनेक आंदोलने केली आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून या कोरोना काळात सोशल मीडिया च्या माध्यमातून १० जुलै २०२० च्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती अधिनियम १९७७ आणि नियमावली १९८१ मधील नियम २ पोटनियम (१)चा खंड (ब)मधील अनुदानित शाळेच्या व्याख्येवरच शासनाने बदल करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळेच १ नोव्हेंबर २००५ रोजी संस्था १०० टक्के अनुदानधारक नाही या सबबीखाली जुनी पेन्शन पासून कर्मचारी जुनी पेन्शन पासून वंचित राहू नये हा शासनाचा डाव हाणून पडण्यासाठी ८ ऑगस्ट रोजी ईमेल द्वारे asc.schedu.@maharashtra.gov.in यावर आपला तीव्र आक्षेप दर्शवावा, असे आवाहन संघटने मार्फत करण्यात आले आहे.

तसेच राष्ट्रीय मा पंतप्रधान यांना व राज्यपातळीवर मा मुख्यमंत्री यांना देखील ३१ ऑक्टोबर २००५ ची अधिसूचना रद्द करून जुनीच पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात इ मेल द्वारे मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटने तर्फे केली जाणार आहे ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त संपूर्ण भारतात नॅशनल मोव्हमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीम द्वारे एनपीएस भारत छोडो अभियान राबवले जाणार आहे. तरी यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी जास्तीत सहभागी होऊन डिसीपीएस /एनपीएस निजिकरण भारत छोडो हा हॅशटॅग वापरून ट्विट व रिट्विट करुन या आंदोलनास बळकटी द्यावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर , राज्य सचिव गोविंद उगले यांनी केले आहे.

असा आहे उपक्रम :

▪️ ८ ऑगस्ट२०२०

१) १० जुलै २०२० च्या अधिसुचने ला विरोध दर्शवून त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी ईमेल्स करायचे आहे.
as.schedu@maharashtra.gov.in
या ईमेल वर मेल करुन आपला आक्षेप नोंदवायचा आहे.
२) पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना जुन्या पेन्शन संदर्भात ईमेल करुन आपल्या जुन्या पेंशन च्या मागणी कडे लक्ष केंद्रित करायचे आहे.
पंतप्रधान ईमेल आयडी –
connect@mygov.nic.in
मुख्यमंत्री ईमेल आयडी – cm@maharashtra.gov.in

▪️ ९ ऑगस्ट २०२०
जसे भारताला स्वतंत्र मिळवुन देण्यासाठी “अंग्रेज भारत छोड़ो” हे अभियान राबविले गेले होते तसेच NPS विरोधात “NPS भारत छोडो” हे अभियान राबवायचे आहे. यासाठी ट्विटर वर
#NPSनिजीकरणभारतछोड़ो हा हॅशटॅग वापरून ९ ऑगस्ट २०२० ला दुपार १२.०० ते ५.०० या वेळेत ट्विट करायचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *