ऑनलाईन बाल वक्ता महाराष्ट्राचा स्पर्धेस उदंड प्रतिसाद…!

| पुणे / विनायक शिंदे | महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन हवेली तालुका शाखेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन बालवक्ता महाराष्ट्राचा ही ऑनलाईन वक्तृत्त्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेस राज्यभरातून उदंड प्रतिसाद लाभला.

विजेत्या स्पर्धकास महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना शाखा हवेली जिल्हा पुणे यांचे मार्फत ई- प्रमाणपत्र देण्यात आले. दरम्यान, स्पर्धेचे परीक्षण अमोल गायकवाड यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी हवेली तालुका अध्यक्ष सागर शिंदे, नेते उमेध धावरे, कार्याध्यक्ष तृप्ती तोडकर, सरचिटणीस सुरेश तांदळे, कोषाध्यक्ष धम्मदिप सातकर, उपाध्यक्ष सुरेश गडदे, उषा बोर्डे, पृथ्वीराज काळे, मोहन शिंदे, किशोर होडशीळ , महेश पवार यांनी प्रयत्न केले.

स्पर्धेचे गट व विजेते

गट क्रमांक एक
( पहिली ते दुसरी)

स्पर्धेसाठी विषय :
• माझी स्वच्छता
• माझे आवडते बापूजी (महात्मा गांधी)

विजेते :

• प्रथम क्रमांक – वरद मारुती दळवी स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीअम स्कूल लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे

• द्वितीय क्रमांक – अनुष्का अमित पवार जि.प. प्रा. शाळा बावडा ता. खंडाळा जि. सातारा

• तृतीय क्रमांक -श्रेयश सुरेश दिघे जि.प. प्रा. शाळा दिघेवस्ती धानोरे ता. राहूरी जि. अहमदनगर

गट क्रमांक 2 (तिसरी ते चौथी)

स्पर्धेसाठी विषय:

• ऑनलाइन शिक्षण – माझा अनुभव
• राष्ट्रपिता महात्मा गांधी (एक आदर्श नेता)

विजेते :

• प्रथम क्रमांक – संभव हरिश्चंद्र निंबाळकर जि.प.प्राथ. शाळा शिरसगाव काटा ता. शिरुर जि. पुणे

• द्वितीय क्रमांक – पियुष नाना शिर्के सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी सावंतवाडी जि. सिंधुुदुर्ग

• तृतीय क्रमांक – स्वराली रविकिरण कातोरे जि.प. प्रा. शाळा टाकळकरवाडी ता. खेड जि. पुणे

गट क्रमांक तीन ( पाचवी ते सहावी)

स्पर्धेसाठी विषय :

• कोरोना काळातील खरे देवदूत.
• मी बंद शाळा बोलतेय (कोरोना पार्श्वभूमीवर)

विजेते :

प्रथम क्रमांक – अक्षदा संतोष वाघ जि.प. प्रा. शाळा लोणी काळभोर नं. २ ता. हवेली जि. पुणे

द्वितीय क्रमांक -अदिती दिनकर गोरे परिमल प्राथमिक विद्यालय लातूर

तृतीय क्रमांक – सायुजा गणेश सोनवणे जि.प.प्रा शाळा लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे

गट क्रमांक चार (सातवी ते आठवी)

स्पर्धेसाठी विषय :

• ऑनलाइन शिक्षण- लॉकडाउन काळातील शिक्षण पर्यायी व्यवस्था.
• इडा पिडा टळु दे, शाळा पुन्हा भरू दे

विजेते :

• प्रथम क्रमांक – रसिका संतोष वाळुंज महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बारामती

• द्वितीय क्रमांक – ओमकार नवनाथ मुठाळ जि.प. प्रा. शाळा वडगाव पिंपळा ता. सिन्नर जि. नाशिक

• तृतीय क्रमांक – जान्हवी मुकुंद गावडे संस्कार गुरुकुल सी.बी.एस.ई.स्कूल आळंदी ता. खेड जि. पुणे

Leave a Reply

Your email address will not be published.