ओपन बुक, एमसीक्यू, असाईनमेंट बेस या पैकी एका पर्यायाद्वारे होणार अंतिम वर्षाची परीक्षा, ३० ऑक्टोबर पर्यंत लागणार निकाल..!

| मुंबई | राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहे. लवकरच विद्यापीठ परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करणार आहे.

अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी विद्यापीठांकडे तीन पर्याय देण्यात आले आहेत. यात ओपन बूक, एमसीक्यू, असाईनमेंट बेस परीक्षेचा समावेश आहे. यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य विद्यापीठांना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रयोगशाळेत जाऊन प्रात्यक्षिक अर्थात प्रॅक्टीकलऐवजी विद्यार्थ्यांची व्हायवा घेतली जाणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी काल, गुरुवारी चर्चा झाल्यानंतर आज कुलगुरूंची समिती आपला अहवाल सरकारला सादर केला. दरम्यान, अकादमी कौन्सिलमध्ये जाऊन या अहवालाला परवानगी घ्यावी लागणार आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर परीक्षा मंडळाकडे अहवाल मान्यतेसाठी पाठवावा लागेल.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा

१५ ते ३० सप्टेंबरपर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक घेण्यात यावे. प्रात्यक्षिके हे ऑनलाइन घेण्यात येणार आहेत. परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन (जिथे जे शक्य असेल ते) असा दोन्ही पद्धतीनं घेण्यात येणार आहे. परीक्षेचा टाईमटेबल ७ सप्टेंबरपर्यंत विद्यापीठांनी कळवावा, परीक्षा कमितकमी एक तास अथवा ५० मार्कची परीक्षा असेल. ३० ऑक्टोबरपर्यंत निकाल लागावा, असं अहवालात म्हटलं आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होतील. परीक्षेच्या तारखा विद्यापीठ त्यांच्या बोर्डात जाऊन निश्चित करणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ७-८ सप्टेंबरला आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन यूजीसीला परीक्षेची तारीख वाढवण्याबाबत विनंती करण्यात येणार आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सगळे निकाल जाहीर करु शकतो, अशी भूमिका कुलगुरुंनी घेतली आहे. त्याबाबत यूजीसीकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे उदय सामंत यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *