कंगनाला केंद्राची सुरक्षा, जाणीवपूर्वक महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधणाऱ्याना बळ देत असल्याची सोशल मीडियातून चर्चा..!

| मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतला व्हाय (Y) श्रेणीची सुरक्षा देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गृह मंत्रालयाकडून ही सुरक्षा देण्यात आली आहे. कंगना रानौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात ट्विटरवॉर झाले होतं. यामध्ये संजय राऊतांनी कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला दिला होता. यावर कंगनाने हे चॅलेंज स्विकारून मी ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, या वादात हिमाचल प्रदेश सरकार नंतर एका अर्थाने केंद्राने उडी घेतली आहे. या साऱ्या प्रकरणावरून केंद्र सरकार महाराष्ट्र विरोधी भूमिका घेणाऱ्यांना पाठीमागे घालत असल्याची जनमानसातील भावना अधिक दृढ होताना दिसत आहे.

कंगनाने याबाबत ट्विटर करून गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. हे प्रमाण आहे की, कोणत्याही देशभक्ताचा आवाज रोखला जाऊ शकत नाही. मी अमित शाह यांची आभारी आहे. परिस्थिती पाहता ते मला काही दिवसांनी मुंबईत येण्याचा सल्ला देऊ शकत होते. त्यांनी भारताच्या मुलीने दिलेल्या वचनांचा मान ठेवला. माझ्या स्वाभिमान आणि आत्मसम्मनाची लाज राखली, असं ट्विटर कंगनाने केलं आहे.

एकंदरीत, जे महाराष्ट्र सरकार विरोधी; ते आपलेच अशी भूमिका केंद्र सरकार घेत असून त्याला सत्याचा वगैरे मुलामा चढवला जात आहे. केंद्र सरकार जिथे भाजप सरकार नाही त्या राज्यांत जिथे शक्य असेल तिथे कुरापती काढत असून कोरोना संकट, विकास, अर्थव्यवस्था यावरून लक्ष हटवण्यासाठी हे सारे सुरू नाही ना? असे प्रश्न देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले जात आहेत. दरम्यान, यावरून अजुन पुढे काय वाद रंगतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *