| नवी दिल्ली | सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यास अध्यक्षपदाची जबाबदारी पुढे कोण घेणार असा प्रश्न आता काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. याबद्दल पक्षात दोन मते आहेत. काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य अध्यक्षपदाची निवड करतील किंवा ब्लॉक स्तरावरुन प्रत्येकाचं मत विचारात घेतलं जाईल.
काँग्रेसचा अध्यक्ष हे गांधी कुटूंब सोडून इतर कोणी असले पाहिजे, असे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आधीच सांगितले आहे. पण राहुल गांधींनी पुढे येऊन पक्षाची जबाबदारी सांभाळावी, असे पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते वारंवार बोलत आहेत. पण राहुल गांधींनी पक्षाचे नेतृत्व सांभाळले नाही तर केवळ सोनिया गांधींनी पक्षाचे नेतृत्व केले पाहिजे, असं देखील नेत्यांचं म्हणणं आहे.
सोनिया गांधी या काँग्रेसचे अंतरिम अध्यक्षपद सोडण्याचा विचार करीत आहेत. काँग्रेसमध्ये बर्याच दिवसांपासून पूर्णवेळ अध्यक्ष असावा अशी मागणी होत आहे. सोनिया गांधी यांनी अंतरिम अध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
उद्या काँग्रेस वर्किंग कमिटीची (सीडब्ल्यूसी) बैठक होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही बैठक संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चेसाठी बोलावण्यात आली आहे. पण उद्या सोनिया गांधी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करतील आणि सभासदांना कोणाला अध्यक्ष करावे यासाठी विचारणा करतील. अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण होणार याबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .