कॉंग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी जीभ घसरली, भाजप उमेदवाराला म्हंटले आयटम..

| भोपाळ | बिहार विधानसभा निवडणुकीबरोबरच उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पोट निवडणुकांचे वारे सुरू आहे. मध्य प्रदेशमधील पोट निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष आहे. दरम्यान, काँग्रेसेच दिग्गज नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथने भाजपाच्या महिला उमेदवाराबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याचे समोर आले आहे. त्यानी केलेल्या विधानावरून भाजपा आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

मध्य प्रदेशच्या डबरा येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाषणा दरम्यान म्हटले की, ”सुरेंद्र राजेश आपले उमेदवार आहेत, साध्या-सरळ स्वभावाचे आहेत. हे तिच्या सारखे नाही? काय तिचे नाव? मी काय तिचे नाव घेऊ तुम्ही तर तिला माझ्यापेक्षाही चांगल्याप्रकारे ओळखतात, तुम्ही तर मला अगोदरच सावध करायला हवं होतं, ‘ही काय आयटम आहे’.”

इमरती देवी, त्या माजी आमदारांपैकी एक आहे. ज्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला आहे. इमरती देवी यांना ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कट्टर समर्थक मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published.