काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल, आझाद, खरगे, सोनी, व्होरा यांना महासचिव पदावरून केले पायउतार..

| नवी दिल्ली | पत्रांच्या प्रकरणावरून काँग्रेस पक्षात वाद निर्माण झाले होते त्यात आता काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद तसेच मल्लिकार्जुन खरगे यांना महासचिव पदावरून हटवण्यात आले आहे. गुलामनबी आझाद हे हरयाणाचे प्रभारी होते. या बदलानुसार, अजय माकन आणि रणदीप सुरजेवाला यांच्या नावांचा समावेश काँग्रेसच्या महासचिव पदांच्या यादीत करण्यात आला आहे. जेष्ठांच्या या यादीतून अंबिका सोनी आणि मोतीलाल व्होरा यांना देखील काँग्रेस पक्षाने डच्चू दिला आहे. या फेरबदलात काँग्रेसला सल्ला देणाऱ्या उच्चस्तरीय सहा सदस्यीय विशेष समितीत सुरजेवाला यांचा समावेश करण्यात आहे आहे. सुरजेवाला हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जातात.

या बरोबरच रणदीप सुरजेवाला यांची नियुक्ती कर्नाटकच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मधुसूदन मिस्त्री यांना केंद्रीय निवडणूक समितीच्या अध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आली आहे. या व्यतिरिक्त के. सी. वेणुगोपाळ यांना संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे.

या फेरबदलाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या महासचिव पदावर मुकुल वासनिक यांना मध्य प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच हरीश रावत यांना पजांबची, ओमान चंडी यांना आंध्र प्रदेशची तारीक अन्वर यांना केरळ आणि लक्षद्वीपची, जितेंद्र सिंह यांना आसामची, तर अजय माकन यांना राजस्थानची जबाबदारी देण्यात आली आहे.

काँग्रेसमध्ये झाले मोठे बदल
या व्यतिरिक्त जितिन प्रसाद यांची काँग्रेसने पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबारच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षातील हे मोठे फेरबदल मानले जात आहे. काँग्रेस पक्षातील वादग्रस्त पत्रावर सह्या करणाऱ्या नेत्यांमध्ये जितिन प्रसाद यांचा समावेश होता.
ताज्या बदलानुसार, पवनकुमार बंसल यांची प्रशासकीय सचिव प्रभारीपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मनकीम टागोर यांची तेलंगणच्या प्रभारीपदावर नियुक्ती करण्यात आले आहे.

नव्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या सदस्यपदी दिग्विजय सिंह, राजीव शुक्ला, मनिकम टागोर, प्रमोद तिवारी, जयराम रमेश, एच. के. पाटील, सलमान खुर्शीद, पवन बंसल, दिनेश कुंदुरो, मनीष चतरथ आणि कुलजीत नागरा यांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *