
| कल्याण | कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर महापालिका हद्दीत राहिलेल्या नऊ गावांमधील २००२ पर्यंतच्या मालमत्तांवरील मालमत्ता करात तब्बल दोन तृतीयांश इतकी घट करण्याचा ऐतिहासिक निर्णय सोमवारी घेण्यात आला. या मालमत्तांना २००२ प्रमाणे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील करमूल्यानुसार कर आकारण्यात येणार असून याचा फायदा नागरिकांना होणार आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासमवेत घेतलेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यास हिरवा कंदील दिला असून या बैठकीला महापौर विनिता राणे याही उपस्थित होत्या. मालमत्ता कर कमी करून येथील रहिवाशांना दिलासा देण्याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे व लोकप्रतिनिधी आग्रही होते.
सन २००२ मध्ये ही गावे महापालिकेतून वगळण्यात आली. सन २०१५ मध्ये महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा त्यांचा समावेश महापालिका हद्दीत करण्यात आला. मात्र, त्यानंतर या गावांमधील मालमत्ता करामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याच्या तक्रारी होऊ लागल्या.
या ९ गावांमधील मालमत्ता कर कमी करून दिलासा देण्याची मागणी सातत्याने होत होती. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासंदर्भात सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला महापौर विनिता राणे व या नऊ गावांमधील स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
या गावांमधील मालमत्तांना सन २००२ चे दर आधारभूत मानून त्या प्रमाणात पुनर्मूल्यांकन करून मालमत्ता कराची आकारणी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे मालमत्ता करात तब्बल दोन तृतीयांश इतकी घट होणार असून त्यामुळे या गावांमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल, तसेच सन २००२ ते २०१५ पर्यंतच्या एम.एम.आर.डी.ए. आणि जिल्हापरिषद मान्यताप्राप्त बांधकामांना सदर नियमावली लागू होईल असे सांगून खा. डॉ. शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आभार मानले.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री