कणखर शायर गेले; प्रसिद्ध गझलकार राहत इंदौरी यांचे निधन..!

| भोपाळ | सुप्रसिद्ध आणि प्रत्येकाला आपल्या शायरीतून भुरळ घालणारे शायर राहत इंदौरी यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज सकाळी त्यांनी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. त्यांच्या निधनाने शायरीचा समुद्र शांत झाला आहे. मध्यप्रदेशच्या इंदूर येथे जन्मलेले राहत साहब केवळ शायर नव्हते तर एक संपूर्ण विद्यापीठ होते. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. तसेच सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली आहे.

राहत इंदौरी यांचा जन्म १ जानेवारी १९५० रोजी कापड मील कर्मचारी रफ्तुल्लाह कुरैशी आणि मकबूल उन निशा बेगम यांच्या घरात झाला होता. ते या दोघांचे चौथे सुपूत्र होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण नूतन स्कूल इंदूर येथे झाले. त्यांनी इस्लामिया करीमिया कॉलेज इंदूर येथून १९७३ मध्ये पदवी परीक्षा पास केली. १९७५ मध्ये बरकतउल्लाह विश्वविद्यालय, भोपाळ येथून उर्दू साहित्यात एमए केले. १९८५ मध्ये मध्य प्रदेशच्या भोज मुक्त विद्यापीठातून उर्दू साहित्यात पीएचडी केली.

आज सकाळी केले होते ट्वीट :

राहत इंदौरी यांनी ११ ऑगस्टच्या सकाळी ट्वीट केले होते. कोविडचे सुरूवाती लक्षण दिसल्याने माझी कोविड चाचणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले आहे. दुवा करा की लवकरात लवकर या आजाराला हरवेल. तसेच एक विनंती आहे की मला आणि घरच्या व्यक्तींना फोन करून नका, माझी खुशाली ट्विटर आणि फेसबूकवरून तुम्हाला मिळत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *