कुणाच्या आईनं इतकं दूध पाजलंय की उद्धव ठाकरेंना अयोध्येत प्रवेश करण्यापासून रोखू शकेल’..!

| मुंबई | अभिनेत्री कंगना रानौत विरुद्ध शिवसेना वादात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनीही उडी घेतलीय. चंपत राय यांनी उद्धव ठाकरेंचं समर्थन केलंय. ‘कुणाच्या आईनं इतकं दूध पाजलंय की उद्धव ठाकरेंना अयोध्येत प्रवेश करण्यापासून रोखू शकेल’ अशा शब्दांत चंपत राय यांनी उद्धव ठाकरेंना अयोध्येत विरोध करणाऱ्यांना लक्ष्य केलंय.

गेल्या काही दिवसांत शिवसेना आणि कंगना रानौत यांच्यातील शाब्दिक चकमक जोरदारपणे रंगली. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आव्हान देताना कंगना रानौतनं ‘मुंबईत येतेय, ज्याच्यात हिंमत असेल त्यानं रोखून दाखवावं’ असं म्हटलं होतं. परंतु, कंगना रानौत मुंबईत दाखल होण्यापूर्वीच तिच्या घर वजा कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेनं हातोडा मारला. यानंतर उद्धव ठाकरे सरकारवर अनेकांनी टीका केली.
उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्यांत विश्व हिंदू परिषदेचा तसंच अयोध्येतील काही साधु-संतांचाही समावेश होता. परंतु, राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय हे उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठामपणे उभे राहिलेत.

Leave a Reply

Your email address will not be published.