| नवी दिल्ली | कोरोना काळात सर्वकाही ठप्प असताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मात्र युद्धपातळीवर रस्ते तयार करण्यात व्यस्त होता. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान मंत्रालयाने रस्ते बांधण्याचा नवा विक्रम नोंदविला आहे. नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने कोरोना काळात अपेक्षेपेक्षा दुप्पट रस्ते तयार केले आहेत, तर मंत्रालयाने महामार्ग बांधकाम पूर्ण करण्याचा तीन वर्षांचा विक्रम मोडला आहे.
वास्तविक, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान एकूण २७७१ किमीचे महामार्ग तयार करण्याचे लक्ष्य ठेवले होते. कोरोना काळातील प्रतिकूल परिस्थिती असूनही, लक्ष्यापेक्षा चारशे किलोमीटरपेक्षा जास्त म्हणजेच ३१८१ किमी महामार्गाचं काम पूर्ण झालं.
यामध्ये राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) २१०४ किमी, एनएचएआय ८७९ किमी आणि एनएचआयडीसीएलने १९८ किलोमीटरचा महामार्ग बांधला. ऑगस्ट २०१९ पर्यंत १३६७ किमी राष्ट्रीय महामार्ग बांधकामाचा विक्रम नोंदवला गेला होता. तर ऑगस्ट २०२० पर्यंत दुप्पट ३३०० किमी राष्ट्रीय महामार्ग बनवण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे.
मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, कोरोनाची साथ असताना एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान ७४४ किलोमीटरचा महामार्ग बनवण्यात आला. ज्याला ३१ हजार कोटींचा खर्च आला. हे गेल्या तीन वर्षातील हा विक्रम आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .