काय म्हणाल : चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच ट्विटर अकाऊंट हॅक..!

| मुंबई | देशात दररोज असंख्य सायबर गुन्हे घडत आहेत. आर्थिक फसवणुकीपासून ते सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्यापर्यंत. पण, आता चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटचं (संकेतस्थळ) ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याची घटना घडली आहे. हॅकरनं नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेलं ट्विटर अकाऊंट हॅक केलं आणि पीएम केअर फंडासाठी डोनेशन म्हणून हॅकरनं चक्क बिटक्वाइन देण्याची मागणी केली. हॅकरनं हे ट्विट नंतर लगेच डिलीट करण्यात आलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वैयक्तिक वेबसाईटचं ट्विटरवर अकाऊंट आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वेबसाईटचं ट्विटरवर narendramodi_in नावानं अकाऊंट आहे. हे अकाऊंटच हॅक करण्यात आल्याची घटना घडली.

पंतप्रधान मोदी यांच्या वेबसाईटचं ट्विटर अकाऊंट हॅकरनं हॅक केलं. त्यानंतर क्रिप्टो करन्सीसंदर्भातील ट्विट केले गेले. एक ट्विट करण्यात आलं की, मी सगळ्यांना आवाहन करतो की, कोविड-१९ साठी बनवण्यात आलेल्या पीएम रिलीफ फंडाला मदत करा. हॅकरनं पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, कोविड-१९साठी उभारण्यात आलेल्या पीएम केअर फंडाला उदारपणे देणगी द्यावी, असं आवाहन मी करतो. आता भारतात क्रिप्टो चलनाला करन्सी सुरूवात होतोय. कृपया देणगी म्हणून बिटक्वाईन दान करावे. -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अधिकृत ट्विट,” असं पहिलं ट्विट करण्यात आलं.

त्यानंतर दुसरं ट्विट करण्यात आलं. ज्यात म्हटलं होत की, ‘हे अकाऊंट जॉन विकने (hckindia@tutanota.com) हॅक केलं आहे. आम्ही पेटीएम मॉल हॅक नाही केला,” असं ट्विटमध्ये हॅकरनं म्हटलं होतं. हे दोन्ही ट्विट नंतर डिलीट करण्यात आले. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक संकेतस्थळाचं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानं चर्चा सुरू झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक वेबसाईटचं ट्विटरवर अकाऊंट आहे. जे अधिकृत (व्हेरिफाईड) असून, ज्याला २५ लाख लोक फॉलो करतात. ज्यांनी हे अकाऊंट हॅक केलं. त्या ग्रुपचं नाव जॉन विक आहे. ३० ऑगस्ट रोजी सायबर सुरक्षा फर्म असलेल्या साईबलने असा दावा केला होता की, जॉन विक ग्रुपचा पेटीएम मॉल डाटा चोरीमध्ये हात आहे. पेटीएम मॉल युनिकॉर्न पेटीएम ई-कॉर्मस कंपनी आहे. मात्र, चौकशीनंतर पेटीएमनं माहिती चोरी झाल्याची कुठलीही घटना झाली नसल्याचं म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *