किरीट सोमय्या यांना भाजपही गंभीरपणे घेत नाही – अनिल परब

| मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर १२ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावर किरीट सोमय्या यांचं एकच काम आहे, आरोप करायचे. भाजपही त्यांना गंभीरपणे घेत नाही, असा टोला मंत्री अनिल परब यांनी लगावला. सोबतचं भाजपनं सध्या कशावरचं राजकारण करू नये, अशी प्रतिक्रियाही परब यांनी दिली आहे. अनिल परब यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

ते बोलताना म्हणाले की किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे कि कोविड काळात ५००० बेड्सचं रुग्णालय उभं करण्याच्या नावाखाली स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर हा घोटाळा केला आहे. किरीट सोमय्या यांचा दावा आहे, की उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून महानगरपालिका आयुक्तांनी ७२ तासांच्या आत एका खाजगी बिल्डराची ५००-७०० कोटींची जागा ३००० कोटींमध्ये विकत घेण्याचा प्रस्ताव पास केला.

किरीट सोमय्या यांना भाजपही गंभीरपणे घेत नाही :

किरीट सोमय्या यांचे एकच काम आहे, आरोप करायचे. भाजपही त्यांना सिरियसली घेत नाही, असा टोला मंत्री अनिल परब यांनी लगावला. भाजपनं सध्या कशावरचं राजकारण करू नये, रेल्वे सुरू करण्यासंदर्भात केंद्र काय निर्णय घेतंय ते पाहू. निदर्शने करण्याचा अधिकार आहे. त्यातून धार्मिक तेढ निर्माण होवू नये. मुंबई पोलीस याबाबतीत निर्णय घेतील (रझा अकादमी बंदी मागणी) अशी प्रतिक्रिया रझा अकादमी संदर्भात दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *